गुन्हेगारी

खुनाचा प्रयत्न करणा-या सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी केले गजाआड!

अहमदनगर दि. ३१ जुलै (प्रतिनिधी) खुनाचा प्रयत्न करणा-या सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केल्याची माहिती समोर आली आहे.
दिनांक २४/०५/२०२३ रोजी फिर्यादी स्वप्निल बाळासाहेब पोपळघट रा. बालिकाश्रम रोड अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, २३/०५/२०२३ रोजी निंबळक ता. जि. अहमदनगर येथे फिर्यादी व त्यांचा मित्र अक्षय हिरामण गायकवाड हा मित्राचे हळदीचे कार्यक्रमात गेले असता, तेथे मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचत असतांना धक्का लागल्याचे कारणावरुन आरोपी सिदधांत शिंदे याने अक्षय हिरामण गायकवाड याला धारधार शस्त्राने बेंबीच्या वरचे बाजुस जोरात खुपसून बाहेर काढुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नंबर ४६०/ २०२३ भादवि कलम ३०७ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन यातील आरोपी हा फरार होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली को सदर गुन्हयातील आरोपी नामे सिद्धांत शिंदे हा निबंळक या ठिकाणी स्मशानभूमीजवळ लपवुन बसला आहे. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना निंबळक येथे पाटविले. सदर पोलीस पथकांनी निंबळक येथून सदर आरोपीला सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सिंदधांत उर्फ दादया रावसाहेब शिंदे वय २२ वर्ष रा. निंबळक ता.जि. अहमदनगर असे सांगीतले. सदर आरोपीकडुन गुन्हयात वापरलेला चाकु जप्त करण्यात आला आहे. सदरचा आरोपी हा सराईत असून त्याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे. आरोपी सिद्धांत उर्फ दादया रावसाहेब शिंदे वय २२ वर्ष रा. निंबळक ता. जि. अहमदनगर खालील
प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ५६८/२०२१ भादवि कलम ३८४,३०७, ३२६ प्रमाणे. २) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ६२३ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे. ३) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ४६०/ २०२३ भादवि कलम ३०७ प्रमाणे.
सदरची कारवाई मा.श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर, श्री. संपराव भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सो. नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई योगेश चाहेर, पोना साबीर शेख, पोना भागवत, पोकों किशोर जाधव, पोकॉ/ जयशिंग शिंदे पोकों/सुरज देशमुख, पोकों/ नवनाथ दहिफळे, पोकॉ राजेश राठोड यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे