सामाजिक

अहमदनगर छावणी परिषद वाहन प्रवेश कर ठेक्याची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी व्हावी-सिद्धार्थ आढाव

अहमदनगर छावणी परिषद वाहन प्रवेश कर ठेक्याची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी व्हावी-सिद्धार्थ आढाव

अहमदनगर (प्रतिनिधी)अहमदनगर छावणी परिषद वाहन प्रवेश कर ठेक्यात चालू असलेला गैरप्रकार पाहता सिद्धार्थ आढाव यांनी मा.प्रधान निदेशालय,रक्षा संपदा,दक्षिण कमान पुणे. (principle Director of defence estates southern command,pune) यांच्याकडे याचा सौक्ष-मोक्ष होण्याकरिता काही प्रमुख मागण्या केल्या आहेत.
त्या पुढील प्रमाणे-
१) गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेला सुपरवाईजर नेमुन त्याचे पोलीस व्हेरीफीकेशन जानीवपूर्वक गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने लपवून अहमदनगर छावणी परिषद प्रशासनाची दीशाभुल करून घोर फसवणूक केल्याने संबंधित ठेकेदार व सुपरवाईजरवर फौजदारी कारवाई करून सुपरवाईजरची तात्काळ हकालपट्टी करून, फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा..

२) करारनाम्याच्या एकूण ४० मुद्यांपैकी कीमान ०८ ते १० मुद्यांचे उल्लंघन-पायमल्ली केल्याप्रकरणी अहमदनगर छावणी परिषद वाहन प्रवेश कर (VET) ठेका तात्काळ रद्द करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे.

३)सदरील ठेक्यामधे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या नेहमी प्रमाणे सामील असणारा ठेका चालवित असलेला दरोडेखोर मोक्का आरोपी ज्याने सप्टेंबर २०१७ मधे व डिसेंबर २०२० मधे त्याच्या विविध सक्रिय टोळीनं मार्फत अहमदनगर छावणी परिषद वाहन प्रवेश पथकर नाक्यावर दरोडा टाकुन वाहन चालक-मालक यांना लुटले आहे त्याचे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या अनुषंगाने संबंधित व्यक्तीवर मोक्का गुन्हयाअंतर्गत कारवाई देखिल झाली आहे. मोक्क्या अंतर्गत कारवाई मधून अटी-शर्तीवर जामिनावर असणारा आरोपी ठेका मिळाल्यापासून ते १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत दीवसा ढवळ्या तो व पथकर नाक्यांवर एकूण अधिकृत २६ कर्मचारी वगळता, बेकायदेशीर रित्या कामावर असणारी त्याची टोळी सर्व पथकर नाक्यांवर सक्तीची खंडणी वसुल करताना मी माझ्या उघड्या डोळ्याने पहिले आहे.पुरावा म्हणून मी पथकर नाक्यांवर असणाऱ्या सी.सी.टी.व्ही फुटेज ची मागणी केली आणि त्याच मुळे मला माहितीचा अधिकार २००५ अन्वे सी.सी.टी.व्ही फुटेज कार्यालयामार्फत उपलब्ध करून दीले गेले नाही.
त्यामुळे आपण स्वत: सदरील प्रकारणाची गंभीर्यता लक्षात घेऊन डिसेंबर २०२१ पासून ते २३ फेब्रुवारी २०२२ पर्यंतीची सी.सी.टी.व्ही कॅमेरा फुटेज हस्तगत करणेसाठी तसेच संगणकीकृत पावती मशीन सोबत छेड-छाड झालीये का? हे तपासण्यासाठी व नेहमीप्रमाणे छावणी परिषद प्रशासनास लुटणारा मोक्का आरोपीच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळण्यासाठी सदरील प्रकरणाची उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी.

सदरील अहवालाद्वारे अश्या एकूण ३ प्रमुख मागण्यांची विनंती करीत आहोत अहवालाद्वारे सबळ व ठोस पुरावे देऊनही आपल्या मार्फत कुठल्याही पद्धतीची दखल अथवा कारवाई येत्या १० दिवसाच्या आत न झाल्यास सोमवार दि.१४ मार्च २०२२ रोजी मा.प्रधान निदेशालय सो,रक्षा संपदा,दक्षिण कमान पुणे (principle Director of defence estates southern command,pune) यांचे कार्यालयात त्यांचे दालनासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे..

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे