केडगाव जागरूक नागरिक मंच च्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

केडगाव (प्रतिनिधी)
केडगाव जागरूक नागरिक मंच नेहमी समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम राबवण्यात अग्रणी असतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजकार्यात तसेच विविध क्षेत्रात स्वतःला वाहून घेतलेल्या महिलांचा सन्मान मंचच्या वतीने केला जाणार आहे. सकाळी 11 ते दु.2 वाजे पर्यंत महिलांची रक्त हिमोग्लोबीन तपासणी मोफत केली जाणार आहे .डॉक्टर सुभाष बागले यांचे हॉस्पिटल केडगाव भाग्योदय विद्यालय शेजारील ओपीडीत तपासणी होणार आहे. तसेच वेळ सायंकाळी ८ ते ९ वाजे पर्यंत महिलांसाठी संतुलित आहार व वजन यांविषयी मार्गदर्शन सौ. स्नेहलता बागले यांचे ऑनलाइन फेसबुक लाईव्ह , युट्युब लाईव्ह तसेच झूम मीटिंग ॲप वर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी महिलांनी स्वतःची एचबी तपासणी करून घ्यावी व सायं आपल्या मुलांना व संपूर्ण कुटूबांच्या संतुलित आहारातून निरोगी राहण्यासाठीचे मार्गदर्शन ऑनलाईन ऐकण्याचे आवाहन मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी केले आहे. श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे हि डॉ. बागले देणार आहेत. श्रोत्यांनी ऑनलाइन लिंक साठी केडगाव जागरूक नागरिक मंच चे FB Page like करावे अथवा 8208954925 या क्रमांकावर व्हॉटस अॅप मेसेज करावा.