उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास रेखाटला जात असून त्यासाठी खासदार विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या निधीतून या कामास निधी उपलब्द केला:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अहमदनगर १९ नोव्हेंबर (प्रतिनिधी) अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा देशाचे रस्ते व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना ते म्हणालेमाजी खा. दिलीप गांधी यांच्या योगदानादसह खा.सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास रेखाटला जात असून त्यासाठी खासदार विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या निधीतून या कामास निधी उपलब्ध केला.याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो.त्यामुळे राज्यात याचे अनुकरण नक्की केले जाईल असे मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
अहमदनगर शहरतील उड्डाण18 डिसेंबर 2020 रोजा पुलाच्या कामास सुरुवात झाली होती.दोन वर्षांच्या आत या पुलाचे काम पूर्ण झाले असून या पुलामुळे स्थानिक वाहतूक राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक विभागली जाणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खा.सदाशिव लोखंडे,खा.सुजय विखे पाटील,आमदार बबनराव पाचपुते,आमदार मोनिका राजळे,आमदार राम शिंदे,आमदार संग्राम जगताप,माजी आमदार शिवाजी कर्डीले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,महापौर रोहिणी शेंडगे,भैय्या गंधे,सुवेंद्र गांधी,यांच्या उपस्थितीत पार पडला.