देशस्तंभ ऑनलाईन न्युज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 18 जुलै : बाबासाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरणच स्वाभिमानी भीमसैनिक यांच्यामुळे होत आहे, आम्ही आवाज उठवला नसता तर त्याकडे कोणीच लक्ष दिले नसते,
आमच्या बापाच्या कार्यक्रमाला कधीच विरोध दर्शविणार नाही, असे सुशांत म्हस्के म्हणाले स्वाभिमानी भीमसैनिकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रतीक बारसे, रोहित (बंडू ) आव्हाड, योगेश साठे, संजय कांबळे, जीवन कांबळे, शनेश्वर पवार, संदीप वाघमारे, अविनाश वानखेडे, जय कदम आदी भीम सैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना म्हस्के म्हणाले, 27 जुलैच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आमचा विरोध नव्हता व केला नाही, समाजाची दिशाभूल करण्यासाठी आमचा वापर केला गेला, आंबेडकरी चळवळी मध्ये नक्कीच दुफळी झाली आहे, एक हिंदुत्ववादी प्रणित चळवळ आणि एक स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ,आमदारांचे काही बुद्धिहीन कार्यकर्ते मला जिहादी असे संबोधतात, तुमचे आमदार अनेक वर्ष मुस्लिम समाजा सोबत राहिले मग त्यावेळेस ते जिहादी होते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने आमचा बाप पडद्या आडून मोकळा होत आहे. समस्त स्वाभिमानी आंबेडकरी समाजाला आभिमान असल्यामुळे 27 जुलैच्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा