ब्रेकिंग
केडगाव येथील मोहिनीनगर भागात भूकंपाचे सौम्य धक्के!

अहमदनगर (प्रतिनिधी)_केडगाव येथील मोहिनीनगर भागात काल रात्री दि. १४ नोव्हेंबर रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणविले आहेत.
केडगाव मोहिनी नगर शिक्षक कॉलनीत भूकंप सारखे सौम्य धक्के बसले आहेत .
अनेक नागरिक घराबाहेर पडून भयभीत होऊन रस्त्यावर आले होते. रात्री 10.30 ते 11 दरम्यान घडली आहे. केडगावातील अनेक नागरिक भयभीत झालेले असल्यामुळे घरातून बाहेर आले होते.