देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 27 ऑगस्ट :
अहिल्यानगर शहरात सध्या रस्त्यांचे कामे बऱ्याच ठिकाणी सुरु आहेत. त्यामुळे साहजिकच वाहतूक कोंडी होत असते. शहरातील पत्रकार चौक येथे रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी होते आहे. ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पत्रकार चौकात स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सुरळीत केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
अशा प्रकारचे कर्तव्यदक्ष अधिकारी असणे गरजेचे आहे. अशा चर्चा रस्त्यावरून येणाऱ्या,जाणाऱ्या नागरिकांमधून होत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा