गुन्हेगारी

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मंगळसुत्र लुटणारी टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 26 ऑगस्ट : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मंगळसुत्र लुटणारी टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे.
बातमीची हकीगत अशी की, दिनांक 20/08/2026 रोजी फिर्यादी श्रीमती द्वारकाबाई उत्तम डाडर, वय 65, रा.नागलवाडी, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर या मिरजगाव येथे जाण्यासाठी रस्त्यांवर थांबलेल्या असताना यातील अज्ञात एक पुरूष व एक महिला आरोपी यांनी त्यांचेकडील चारचाकी वाहनामधुन फिर्यादीस मिरजगाव येथे सोडण्याचा बहाणा करून, गाडीत बसविले.फिर्यादीस गाडीमधुन काही अंतरावर नेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचे गळयातील मणिमंगळसुत्र जबरीने काढुन घेतल्यानंतर फिर्यादीस गाडीमधुन ढकलून देऊन निघुन गेले.याबाबत मिरजगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 317/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4), 352 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील उघडकीस न आलेले मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, जालींदर साखरे, प्रशांत राठोड व ज्योती शिंदे यांचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
तपास पथक गोपनीय बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे वर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना दिनांक 25/08/2026 रोजी माहिती मिळाली की, नमूद गुन्हा हा लक्ष्मण जामदार, रा.कोकणगाव, रा.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर याने कोमल भाऊसाहेब नन्नवरे, रा.डावरवाडी, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर हिचेसह केला असून कोमल नन्नवरे ही तारकपूर बसस्टॅण्ड, अहिल्यानगर येथे थांबलेली आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून तारकपूर बसस्टॅण्ड परिसरात संशयीत महिलेचा शोध घेऊन 1) कोमल भाऊसाहेब नन्नवरे, वय 30, रा.डावरवाडी, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर हिस ताब्यात घेतले.तसेच ताब्यातील महिला आरोपीचा साथीदार हा त्याचेकडील हुंदाई कंपनीची AURA कारमधुन सोलापूर रोडने अहिल्यानगर शहराकडे येत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून कोंबडीवाला मळा, अहिल्यानगर येथून 2) लक्ष्मण मोहन जामदार, वय 26, रा.कोकणगाव, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दोघांनी मिळून मागील चार दिवसापुर्वी नागलवाडी, ता.कर्जत येथुन हुंदाई कंपनीची AURA कारमधुन एका वृध्द महिलेस गाडीमध्ये बसवून, तिस धाक दाखवून तिचे गळयातील मंगळसुत्र जबरीने काढुन घेतले असल्याची माहिती सांगीतली. आरोपीतांनी अशाच प्रकारचे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांचेकडील कारमधुन पाथर्डीजवळ, पाथर्डी ते अहिल्यानगर रोडवर एका वृध्द महिलेस कारमध्ये लिफ्ट देण्याचा बहाणा करून गाडीमध्ये बसवून तिचे गळयातील मंगळसुत्र काढुन घेऊन, महिलेस कारमधुन खाली ढकलून दिल्याची माहिती सांगीतली.आरोपीतांनी सांगीतलेल्या माहितीवरून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गुरनं व कलम
1 मिरजगाव 317/2026 बीएनएस कलम 309 (4)
2 पाथर्डी 980/2026 बीएनएस कलम 309 (4)
पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी लक्ष्मण मोहन जामदार याचे कब्जातून 7,00,000/- रू किं.त्यात त्याने गुन्हा करताना वापरलेली विनाक्रमांकाची हुंदाई AURA कार, 500/- रू किं.त्यात गाडीमध्ये ठेवलेली एमएच-42-बीएन-8999 गाडीची नंबर प्लेट, 90,000/- रू किं.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व 10,000/- रू किं.एक मोबाईल असा एकुण 8,00,500/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी नामे लक्ष्मण मोहन जामदार याचेकडे वरील दोन्ही गुन्हयांत चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता त्याने जप्त करण्यात आलेला मुद्देमालातील सोन्याचे दागीने हे पाथर्डी येथून चोरलेले असून, नागलवाडी, ता.कर्जत येथून चोरी केलेले सोन्याचे दागीने त्याने विक्री केले असून मिळालेले पैस त्याचे बँकेच्या खात्यात टाकलेले असल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील वर नमूद दोन्ही आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी मिरजगाव पोलीस स्टेशनला हजर केले असुन पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 20/08/2026 रोजी फिर्यादी श्रीमती द्वारकाबाई उत्तम डाडर, वय 65, रा.नागलवाडी, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर या मिरजगाव येथे जाण्यासाठी रस्त्यांवर थांबलेल्या असताना यातील अज्ञात एक पुरूष व एक महिला आरोपी यांनी त्यांचेकडील चारचाकी वाहनामधुन फिर्यादीस मिरजगाव येथे सोडण्याचा बहाणा करून, गाडीत बसविले.फिर्यादीस गाडीमधुन काही अंतरावर नेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचे गळयातील मणिमंगळसुत्र जबरीने काढुन घेतल्यानंतर फिर्यादीस गाडीमधुन ढकलून देऊन निघुन गेले.याबाबत मिरजगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 317/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4), 352 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील उघडकीस न आलेले मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, जालींदर साखरे, प्रशांत राठोड व ज्योती शिंदे यांचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
तपास पथक गोपनीय बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे वर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना दिनांक 25/08/2026 रोजी माहिती मिळाली की, नमूद गुन्हा हा लक्ष्मण जामदार, रा.कोकणगाव, रा.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर याने कोमल भाऊसाहेब नन्नवरे, रा.डावरवाडी, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर हिचेसह केला असून कोमल नन्नवरे ही तारकपूर बसस्टॅण्ड, अहिल्यानगर येथे थांबलेली आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून तारकपूर बसस्टॅण्ड परिसरात संशयीत महिलेचा शोध घेऊन 1) कोमल भाऊसाहेब नन्नवरे, वय 30, रा.डावरवाडी, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर हिस ताब्यात घेतले.तसेच ताब्यातील महिला आरोपीचा साथीदार हा त्याचेकडील हुंदाई कंपनीची AURA कारमधुन सोलापूर रोडने अहिल्यानगर शहराकडे येत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून कोंबडीवाला मळा, अहिल्यानगर येथून 2) लक्ष्मण मोहन जामदार, वय 26, रा.कोकणगाव, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दोघांनी मिळून मागील चार दिवसापुर्वी नागलवाडी, ता.कर्जत येथुन हुंदाई कंपनीची AURA कारमधुन एका वृध्द महिलेस गाडीमध्ये बसवून, तिस धाक दाखवून तिचे गळयातील मंगळसुत्र जबरीने काढुन घेतले असल्याची माहिती सांगीतली. आरोपीतांनी अशाच प्रकारचे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांचेकडील कारमधुन पाथर्डीजवळ, पाथर्डी ते अहिल्यानगर रोडवर एका वृध्द महिलेस कारमध्ये लिफ्ट देण्याचा बहाणा करून गाडीमध्ये बसवून तिचे गळयातील मंगळसुत्र काढुन घेऊन, महिलेस कारमधुन खाली ढकलून दिल्याची माहिती सांगीतली.आरोपीतांनी सांगीतलेल्या माहितीवरून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गुरनं व कलम
1 मिरजगाव 317/2026 बीएनएस कलम 309 (4)
2 पाथर्डी 980/2026 बीएनएस कलम 309 (4)
पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी लक्ष्मण मोहन जामदार याचे कब्जातून 7,00,000/- रू किं.त्यात त्याने गुन्हा करताना वापरलेली विनाक्रमांकाची हुंदाई AURA कार, 500/- रू किं.त्यात गाडीमध्ये ठेवलेली एमएच-42-बीएन-8999 गाडीची नंबर प्लेट, 90,000/- रू किं.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व 10,000/- रू किं.एक मोबाईल असा एकुण 8,00,500/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी लक्ष्मण मोहन जामदार याचेकडे वरील दोन्ही गुन्हयांत चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता त्याने जप्त करण्यात आलेला मुद्देमालातील सोन्याचे दागीने हे पाथर्डी येथून चोरलेले असून, नागलवाडी, ता.कर्जत येथून चोरी केलेले सोन्याचे दागीने त्याने विक्री केले असून मिळालेले पैसे त्याचे बँकेच्या खात्यात टाकलेले असल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील वर नमूद दोन्ही आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी मिरजगाव पोलीस स्टेशनला हजर केले असुन पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे