ब्रेकिंग

मोक्क्यांसह 6 गुन्हयातील फरार आरोपी 2 साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात 3 आरोपीकडून चांदबिबी महाल येथून 2 गावठी कट्टे व काडतुस जप्त

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 25 ऑगस्ट : मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
नमूद आदेशानुसार श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
दिनांक 25/08/2026 रोजी पथक नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान अवैध शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना इसम नामे लखन कासार, रा.पाथर्डी यांचेकडे गावठी कट्टा असून तो त्याची विक्री करण्यासाठी त्याचे दोन साथीदारासह चांदबिबी महालाजवळ अहिल्यानगर ते पाथर्डी रोडवरील सर्कल येथे थांबलेले असल्याची गोपनीय माहिती पथकास मिळाली.मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता एका पल्सर मोटार सायकलजवळ 3 इसम संशयीतपणे उभे राहिलेले दिसले.पथक संशयीत इसमांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना त्यातील एक इसम पळून जाऊ लागला त्यावेळी पथकातील पोलीस अंमलदारांनी पळून जाणाऱ्या इसमांचा पाठलाग करून घटनाठिकणाहुन 1) लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार, वय 29, रा.कासारवाडी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर 2) सचिन राजेंद्र खाडे, वय 30, रा.अमानवस्ती, तीनखडी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर 3) अनिकेत दिलीप पटारे, वय 22, रा.धामोरी, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीची पंचासमक्ष अंगझडती घेऊन त्यांचे ताब्यातून 1,04,000/- रू किं.त्यात दोन गावठी कट्टे, 2 जिवंत काडतुस, 30,000/- रू किं.त्यात तीन मोबाईल व 90,000/- रू किं.त्यात विना क्रमांकाची एक पल्सर मोटार सायकल असा एकुण 2,24,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपी लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार यास अधिक विश्वासात घेऊन जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता त्याने मिळून आलेले गावठी कट्टे हे त्याचे साथीदारासह विक्री करण्यासाठी आणले असल्याची माहिती सांगीतली.लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता त्यास मा.उपविभागीय दंडाधिकारी, पाथर्डी यांनी दिनांक 10/01/2025 रोजीपासुन 2 वर्षाकरीता अहिल्यानगर जिल्हयातून हद्दपार केलेले आहे. 
ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येऊन त्यांचेविरूध्द नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 740/2026 आर्म ऍ़क्ट 3/25,7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
 ताब्यातील आरोपीपैकी लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार व सचिन राजेंद्र खाडे हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापुर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र. आरोपीचे नाव दाखल गुन्हे
1 लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार 1. पाथर्डी 1097/2024 बीएनएस 115(2), 118(1) (फरार)
2. पाथर्डी 151/2018 भादंविक 143,147,148,323
3. पाथर्डी 158/2017 भादंविक 143,147,148,504,506
4. पाथर्डी 308/2023 भादंविक 307,326,337,323,504,
5. पाथर्डी 38/2023 भादंविक 324,323
6. पाथर्डी 580/2023 भादंविक 392,435,34
7. पाथर्डी 584/2018 पोक्सो कलम 8
8. पाथर्डी 594/2020 भादंविक 324,323,504,506
9. पाथर्डी 810/2025 बीएनएस 309(6) (फरार)
10. पाथर्डी 927/2023 भादंविक 324,323
11. पाथर्डी 930/2020 भादंविक 307,326, 143, 147, 148,
12. पाथर्डी 1094/2024 बीएनएस 118(1), 119(1) (फरार)
13. सोनई 171/2019 भादंविक 143,147,148,149
14.पाथर्डी 155/2017 भादंविक 143,147,148,149
15.सांगवी, पिंपरी चिंचवड 491/2024 बीएनएस 140(2), 3(5) मकोका कायदा कलम 3(1)(ii), 3(2),3(4) (फरार)
16.पाथर्डी 1227/2025 बीएनएस 310 (2), 311 (फरार)
17.पाथर्डी 693/2025 बीएनएस 309, 3(5) (फरार)
2 सचिन राजेंद्र खाडे 1) पाथर्डी 510/2020 भादंविक 307 आर्म ऍ़क्ट 4/25
2) पाथर्डी 1135/2025 बीएनएस 303 (2)
वरील कारवाई मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे