श्री आनंद महाविद्यालयात निर्भय कन्या योजने अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन..

प्रतिनिधी वजीर शेख
श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी, विद्यार्थी विकास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ रोजी ‘निर्भय कन्या’ अभियाना अंतर्गत महाविद्यालयात विशेष व्याख्यान शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये डॉ. सपना गांधी, अरिहंत हॉस्पिटल ,पाथर्डी यांनी ‘स्त्रियांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. स्त्रीचे शारीरिक स्वास्थ्य जर व्यवस्थित राहायचे असेल तर तिने आहार, विहार, निद्रा याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. दैनंदिन दिनचर्या, ओमकार , सूर्यनमस्कार, व्यायाम, प्राणायाम इत्यादी गोष्टींकडे लक्ष दिले तरच तिचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहू शकते. त्याचबरोबर आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले तर मनावर, शरीरावर परिणाम होतो. त्यासाठी प्राणायाम, मेडिटेशन, ओमकार मंत्र, विचारा मधील सकारात्मकता खूप परिणामकारक ठरू शकते. स्त्रियांच्या अंगी अनेक भूमिका पार पाडण्याची किमया असते .त्यासाठी प्रत्येकीने शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपण्याची आत्यंतिक गरज आहे असे त्यांनी नमूद केले.
या अभियानाअंतर्गत दुसरे व्याख्यान डॉ. पांडुरंग काकडे यांनी महिला व्यक्तिमत्व विकास आणि सशक्तीकरण या विषयावर दिले. व्यक्तिमत्व विकास का महत्वाचा आहे याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. महिला या जगातील प्रतिभांचा मोठा साठा आहे, म्हणून प्रगतिशील देशासाठी त्या खूप योगदान देऊ शकतात. तसेच त्यांचा व्यक्तिमत्व विकास व सक्षमीकरण झाले पाहिजे, त्यासाठी त्यांना अधिकार जबाबदारी आणि आदर दिला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
या अभियानाअंतर्गत प्राध्यापिका मनीषा सानप मॅडम यांचे ‘समान संधी’ या विषयावर तिसरे व्याख्यान झाले. भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना भारतीय राज्यघटनेने समान संधी उपलब्ध करून दिलेली आहे, कुठलेही क्षेत्र असो आज स्त्री यशाचे अनेक दालने पार पाडत आहे पार करत आहे असे त्यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ श्री आनंद कॉलेज पाथर्डी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार सर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना आत्मनिर्भर होण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्राध्यापक डॉ. बर्शीले सर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ. जयश्री खेडकर मॅडम यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका अनिता पावसे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक अजिंक्य भोर्डे सर, अरुण बोरुडे सर , डॉ. भावसार सर, प्राध्यापिका रूपाली शिंदे, तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.