कृषीवार्ता

ड्रोनमुळे पिकांवरील औषध फवारणी होणार फायदेशीर – अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ

राहुरी / प्रतिनिधी — भारतीय शेतीमध्ये आतापर्यंत बरीच प्रगती झाली आहे. शेतकऱ्यांनी संशोधन व नविन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे त्यांना फायदा झाला आहे. शेतीमध्ये औषध फवारणी करतांना ड्रोन महत्वाचा घटक ठरणार आहे. पिकांचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी औषध फवारणी करणे गरजेचे असते. त्याचबरोबर विविध अन्नद्रव्य पिकांवर फवारावे लागतात. या सर्व कामासाठी मनुष्यबळाची गरज असते. यावेळी ड्रोनचा वापर झाल्यास औषध फवारणी फायदेशीर होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील मालवडगाव या ठिकाणी ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजीत करण्यात आले होते. यावेळी डॉ. रसाळ बोलत होते. याप्रसंगी प्रकल्प समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार, आंतरविद्या जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, प्रकल्प सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे, कृषि अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य तसेच अमेरिकास्थित आय.टी. प्रोफेशनल इंजि. किशोर गोरे, इफको कंपनीचे अधिकारी व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री. बापुसाहेब उंडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी कास्ट प्रकल्पांतर्गत ड्रोन विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करणार असल्याचे जाहिर केले. या फवारणी प्रात्यक्षिकाचे आयोजन हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी शास्त्रज्ञ मंत्र यांच्याकरीता इफको ज्ञानो युरीया व सागरीका ड्रोनद्वारे करण्यात आले. यो प्रात्यक्षिक पाहाण्यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सर्व शेतकरी उपस्थित होते. यावेळी डॉ. सचिन नलावडे, इंजि. योगश दिघे व डॉ. गिरीषकुमार भणगे यांनी ड्रोन प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे