14 एप्रिल च्या आत पुतळा उभारा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार – दिपक केदार

अहमदनगर (प्रतिनिधी)शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुर्णाकृती करून ऊंची वाढवावी. 1961 ला दादासाहेब रूपवते यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झालेले आहे. तेंव्हा पासून आजपर्यंत त्याच सुशोभीकरण झालेलं नाही. अहमदनगर मधील इतर महापुरुषांचे पुतळे भव्य सुशोभित रित्या उभे आहेत. ही एकप्रकारे जाणीव पूर्वक केलेली विटंबना आहे.14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी पूर्णाकृती पुतळा उभारावा अन्यथा नगरसह जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी संघटना व ऑल इंडिया पँथर सेना राज्यभर तीव्र आंदोलन करेल अशी भूमिका ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी घेतली आहे.बीड वरून मुंबई दौऱ्यावर असतांना ते नगरला थांबले होते.त्यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे जिल्हा अद्यक्ष योगेश थोरात, सागर ठोकळ,अमर घोडके,नूतन जिल्हा उप अद्यक्ष नवीन भिंगारदिवे,नेवासा तालुका अद्यक्ष प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले,संविधान निर्मात्यांचा पुतळा मात्र धूळखात पडलेल्या अवस्थेत आहे. पुतळ्याच्या लगत उड्डाणपूल झालेला असल्यामुळे भविष्यात विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुतळ्याच्या पाठीमागे एक अतिक्रमित हॉटेल आहे ते तात्काळ हटवावे व भव्य पुर्णाकृती पुतळा जो पुलाच्याही वर असेल असा पुतळा तात्काळ बसवावा.
जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटना, ऑल इंडिया पँथर सेना सातत्याने मागणी करत आहे. आमचा अल्टिमेटम आहे येणाऱ्या 14 एप्रिल च्या आत पुर्णाकृती भव्य पुतळा निर्माण करावा अन्यथा नगरसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.