गुन्हेगारी

श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्यावर कारवाई! पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने श्रीगोंद्यात कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 17 मे : पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन साहेब यांनी गोपनीय माहितीच्या आधारे श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी व्यंकनाथ व आढळगाव या गावांमध्ये अवैध गुटखा व सुगंधी पान मसाला विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यांनी तत्काळ कारवाई करणे कामी कळवल्याने बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व पोलीस पथक असे लोणी व्यंकनाथ या ठिकाणी जाऊन खात्री केली असता इसम नामे प्रवीण सतीश गायकवाड यांचे किराणा दुकान व गोडाऊन तसेच क्रेटा गाडीमध्ये अवैधरित्या गुटखा व पान मसाला विक्रीच्या उद्देशाने बाळगताना मिळून आले व शरद सिताराम वडवकर हे त्यांच्या किराणा दुकान मध्ये गुटका व पानमसाला विक्री करत असल्याचे मिळून आले. तसेच सदर किराणा दुकानदार यांना गुटखा पोहोचविण्याकरिता आलेली मारुती सुझुकी कंपनीची कॅरि मालवाहतूक गाडी मिळून आली. सदर गाडीची तपासणी केली असता सदर गाडीत गुटखा तंबाखू पान मसाला मिळून आला सदर वाहनावरील चालक व विक्री करणारा नागेश नीलकंठ
सुमकवर यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सदर मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, सदरचा सदरचा गुटखा व पानमासाला हा रवी बबन दळवी राहणार रोकडोबा चौक श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा यांच्या सांगण्यावरून टाकण्यास आलो आहे. त्यानंतर सदर गाडीची झडती घेतली असता त्यात गुटखा व पान मसाला मिळून आला.
तसेच त्यांनी सांगितले की, मी आढळगाव शिवारातील अक्षय राजू होले राहणार आढळगाव यास देखील गुटखा व पान मसाला टाकला आहे. यावरून सदर ठिकाणी जाऊन कारवाई करून गुटखा मिळून आल्यानंतर जप्त केला.
श्रीगोंदा तालुक्यातील चार ठिकाणी छापा कारवाई करून कारवाई दरम्यान चार लाख 40 हजार 296 रुपये किमतीचा गुटखा व पानमसाला तसेच 22 लाख रुपये किमतीची क्रेटा गाडी, टोयोटा ग्लांजा व मारुती सुझुकी कंपनीची कॅरी गाडी मिळून आली आहेत.
तसेच सदर कारवाईदरम्यान शरद सिताराम वडवकर राहणार लोणी व्यंकनाथ व नागेश नीलकंठ सुमकवर राहणार श्रीगोंदा यांना ताब्यात घेऊन पुढील तपास कामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांच्याकडे दिलेले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवलदार भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे, पोलीस नाईक शरद गांगर्डे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास शीपनकर, राजू भोर ,दादासाहेब शिरसागर यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे