देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 15 मे : मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ संदिप मुरकुटे, भगवान थोरात, विशाल तनपुरे, रमीजराजा आतार यांचे पथक तयार करुन अवैध वाळु उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.
दिनांक 15/05/2026 रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्येे पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत महाकांळ वडगाव गावचे शिवारातील गोदावरील नदीपात्रातुन एक इसम हा ट्रॅक्टर व ट्रॉलीचे सहाय्याने वाळुची चोरुन वाहतुक करत असल्याची माहिती प्राप्त झाली.
पथकाने तात्काळ महाकांळ वडगाव शिवारात जावुन खात्री केली असता एक इसम गोदावरी नदीपात्रात ट्रॅक्टर ट्रॉली घेवुन येतांना दिसुन आला. तेव्हा पथक कारवाई करणे कामी त्याचेकडे जात असता तो ट्रॅक्टर ट्रॉली घेवुन पळुन जावु लागला. पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव आकाश पुंजाहरी माकडे वय-27 वर्षे रा. डागपिंपळगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमांचे कब्जातुन 10,000/- रु किमंतीची 01 ब्रास वाळु, 5,00,000/-रु किमतीची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण 5,10,000/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 180/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाणे करीत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध धंदे चालु असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणे बाबत नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा