कौतुकास्पद
अवैध देशी व विदेशी दारुची वाहतुक करणा-यावर स्थानिक गुन्हे शाखेकडुन छापा! 8,12,600/-रु किमतीचा मुद्देमाल पोलिसाच्या ताब्यात!

- देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर, दि 15 मे : मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, सुनिल मालणकर, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन अवैध धंदे करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.
दिनांक 14/05/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत एक इसम त्याचेकडील बोलेरो गाडी क्रमांक एम.एच.16.डी.एम. 9244 यामधुन देशी व विदेशी दारुचे बॉक्स विक्री करणेकामी वाहतुक करणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
पथकाने तात्काळ जामखेड शहरात मारुती मंदिरा जवळ खर्डारोडवर जावुन सापळा रचुन थांबले असता बातमीतील नमुद वाहन येतांना दिसली. तेव्ह पथकाने सदर वाहन थांबवुन चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव शरद बाबासाहेब शिकारे वय-37 वर्षे रा. शिकारेवस्ती, बाळगव्हाण ता. जामखेड जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले
ताब्यातील इसमांचे कब्जातुन 63,000/- रु किमतीचे देशी विदेशी दारु, 7,50,000/-रु किमतीची बोलेरो चारचाकी वाहन असा एकुण 8,13,600/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 297/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(अ),(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असुन पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करीत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध धंदे चालु असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणे बाबत नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.



