राजकिय
नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयास माजी आरोग्य समिती सभापती अजय साळवे यांची सदिच्छा भेट विविध विषयांवर चर्चा

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 13 मे : शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीस सातत्याने सहकार्य करणारे प्रभाग क्रमांक 13 चे कृतिशील नगरसेवक तथा महानगर पालिकेचे स्थायी समिती सदस्य सुरेशभाऊ बनसोडे यांच्या मार्केटयार्ड कोठी रस्त्यावरील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन काही दिवसापूर्वी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या शुभहस्ते व महानगर पालिकेचे नगरसेवक, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते अशोकराव गायकवाड तसेच महानगर पालिकेचे व विविध खात्यातील अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
याच पार्श्वभूमीवर आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य समिती सभापती अजय साळवे यांनी नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी शहरातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
लव्ह जिहाद व ट्रॅव्हल जिहाद सारख्या महत्वाच्या प्रश्नावर आमदार संग्राम भैय्या जगताप व नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी पत्रकार महेश भोसले, अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, सतीश थोरात, येशूदास वाघमारे, निखिल साळवे, राहुल साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.