राजकिय

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित दहा सदस्यांचा 14 मे रोजी शपथविधी सभापती प्रा. राम शिंदे सदस्यत्वाची शपथ देणार मुख्यमंत्री महोदयांसह महनीय नेत्यांची उपस्थिती

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : मुंबई, (प्रतिनिधी / वार्ताहर) – महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सन्माननीय सदस्य आणि पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या एक सन्माननीय सदस्या अशा दहा नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांचा शपथविधी गुरुवार, दिनांक 14 मे, 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा. राम शिंदे हे या दहा सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील.

1) डॉ. नीलमताई गोऱ्हे, 2) श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू,
3) श्री. अंबादास एकनाथराव दानवे, 4) डॉ. प्रज्ञा राजीव सातव,
5) श्री. प्रमोद शांताराम जठार, 6) श्री. झीशन झिआउद्दीन सिध्दीकी,
7) श्रीमती माधवी संजय नाईक, 8) श्री. सुनिल विनायक कर्जतकर,
9) श्री. विवेक बिपिनदादा कोल्हे, 10) श्री. संजय नथ्थुजी भेंडे

या नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांना सभापती महोदय शपथ देतील. या शपथविधी समारंभास विधानसभेचे अध्यक्ष माननीय ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस, उप मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे आणि माननीय श्रीमती सुनेत्राताई पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय श्री. अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री माननीय श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना निमंत्रित करण्यात आले असून या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्यांनाही शपथविधी समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. विधानपरिषदेच्या विद्यमान उप सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे सलग पाचव्यांदा सदस्यत्वाची शपथ घेतील.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे