ब्रेकिंग
कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवलेल्या 25 गोवंशीय जनावरांची सुटका, 4,62,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

- देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर: दि. 15 मे : मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ समीर अभंग, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, भिमराज खर्से चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 15/05/2026 रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्येे पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत राहुरी शहरात खाटीक गल्ली येथे काही इसम पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याचे उद्देशाने निर्दयतेने बांधुन ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली.
पथकाने तात्काळ राहुरी शहरात खाटीक गल्ली येथे खात्री केली असता सदर ठिकाणी गोवंशीय जिवंत जनावरे हे चारा पाण्याविना निर्दयतेने बांधुन ठेवल्याचे दिसुन आले. पथकाने सदर जनावरे कोणाचे आहे याबाबत विचारपुस करता सदरचे जनावरे हे अन्सार कुरेशी व वशीम कुरेशी व इतर यांचे असल्याचे सांगितले.
पथकाने सदर ठिकाणावरुन 1,62,000/-रु किमंतीचे 25 जिवंत गोवंशीय जनावरे, 1,00,000/- रु कि.ची 500 किलो गोमांस, 2,00,000/-रु कि.ची एक छोटा हत्ती टेम्पो असा एकुण 4,62,000/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपीविरुध्द राहुरी पोलीस ठाणे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271,325,3(5) प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(ब), 5(क), 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध धंदे चालु असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणे बाबत नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.



