
मुंबई । दि.16 अभिनेते रमेश देव,भारताची गाण कोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर चित्रपट सृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे.
ज्येष्ठ गायक – संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली. अंगभर सोन्याचे दागिने ते घालत. ते गा दागिन्यांमुळेही प्रसिध्द होते.
बप्पी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे बप्पी लाहिरी हे आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते.
आपल्या हटक्या शैलीनं त्यांनी बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली.
2021 मध्ये बप्पी लहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. भंकस नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ऐकायला मिळाले होते.