राहुरी / प्रतिनिधी — तालुक्यातील प्रवरा पट्ट्यातील प्रगत समजल्या जाणाऱ्या चिंचोली विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून १६ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डी.सी. नागरगोजे यांनी सांगितले आहे
या संस्थेची सन २०२१-२२ ते २०२६-२७ पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून संस्थेचे जवळपास ९६५ सभासद आहेत संस्थेचे भागभांडवल ७८ लाखावर असून मागील वर्षी संस्थेने सभासदांना ८ टक्के नफा वाटणी दिली आहे
येत्या १६ फेब्रुवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून २२ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवली आहे अर्जाची छाननी २३फेब्रुवारी तर २४ तारखेला यादी प्रसिद्ध होणार आहे २४ फेब्रुवारी पासून १० मार्च पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे ११ मार्चला चिन्ह वाटप तर २० मार्चला सकाळी ८-३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून मतदानानंतर १ तासाने मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नागरगोजे यांनी सांगितले सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव प्रदिप काळे काम पाहणार आहेत
प्रवरा पट्ट्यातील प्रगत समजल्या जाणाऱ्या या संस्थेवर अधिक काळ विखेंचे वर्चस्व राहिले आहे यंदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत ज्येष्ठ मंडळींबरोबर तरुणाईचाही बिनविरोधचा आग्रह आहे येत्या काही काळात निवडणूक की बिनविरोध याचा निर्णय होणार आहे.