
केडगाव प्रतिनिधी – मनीषा लहारे
प्रहार जनशक्ती पक्षाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने अंधत्वाकडून दृष्टीकडे मोतीबिंदू मुक्त अभियान यामध्ये भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया या शिबीरांचे आयोजन केले आहे .
हे अभियान शुक्रवार दि.१८ फेब्रुवारी २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालया समोर खडकी , ता.दौंड , जि.पुणे येथे
सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेमध्ये होणार आहे .
भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे.
▶️या शिबीराचा लाभ :-
१) मोतीबिंदू २) काचबिंदू ३) नासुर ४) काळ्या बुबळावरती वाढलेली कातडी (टेरिजियम) इत्यादी रुग्णांना मिळणार आहे.
▶️शिबीरामध्ये मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांचे बुधराणी हॉस्पीटल पुणे येथे शस्रक्रिया केली जाणार आहे.
▶️टिप : अल्पदरात चष्मे वाटप करण्यात येणार
आहे.
▶️शस्त्रक्रिया करण्यासाठी बुधराणी हॉस्पिटलची गाडीची येण्या जाण्यासाठी सुविधा आहे.
खडकी परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेवून या मोतीबिंदू मुक्त अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रमेश शितोळे – देशमुख यांनी केले आहे .