देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 27 मार्च : अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी शिवप्रेमी नगरसेवक,शिवद्रोही नगरसेवक श्रीपाद छिंदम याला सभागृहातून हाकलून देण्यासाठी एकवटले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यावेळी आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे कट्टर समर्थक नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांनी आक्रमक पवित्रा घेत त्याला हाकलून द्या, अशी भूमिका घेतली. नगरसेवकांनी हा जर आमच्या बरोबर बसणार असेल तर आम्ही सभा त्याग करू अशी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी महापालिकेचे अधिकारी तसेच माजी उपमहापौर, ज्येष्ठ नगरसेवक अविनाश तात्या घुले, नगरसेवक मयूर बांगरे, नगरसेवक महेश लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तसेच भारतीय जनता पार्टी चे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा