आरोग्य व शिक्षण
दिनकर सुर्यवंशी यांना आदर्श कलारत्न पुरस्कार

दिनकर सुर्यवंशी यांना आदर्श कलारत्न पुरस्कार
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
ग्रामीण भागातील युवा कलाकार दिनकर सुधाकर सुर्यवंशी देऊळगांव घाट यांना कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई या संस्थेअंतर्गत “कलारत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.अनेक वर्षापासुन ते आपल्या संगीत कलेची साधना करत आहेत.तसेच अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वर विहार संगीत विद्यालयात संगीताचे प्रशिक्षण देत आसुन शास्रीय संगीताचा प्रचार-प्रसार करत आहेत.हे लक्षात घेत त्यांना मा.ऊपसंचालक शिक्षण विभाग पुणे सुरेश बी माळी,कर्करोग शास्रज्ञ अमजद खान पठाण,आं.राष्र्टिय किर्तीचे वास्तुतज्ञ रविराज आहिरराव,शाहिर गायक नंंदेश ऊमप,जेष्ठ अभिनेते जयराज नायर,पो.ऊपनिरीक्षक सुयोग अमृतकर यांच्या हस्ते कलारत्न पुरस्कार देण्यात आला आहे. तेव्हा त्यांना सर्व ठिकाणाहून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे