कर्जत येथे संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

कर्जत प्रतिनिधी : दि १४
पालकमंत्री अहमदनगर यांच्या आदेशानुसार नुतन संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती कर्जत तालुक्यात स्थापन करण्यात आली असून सोमवार, दि १४ फेब्रुवारी रोजी पहिली बैठक तहसील कार्यलयात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले आणि प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी लाभार्थी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आली.
सदर बैठकीत संजय गांधी निराधार योजनेचे १५२ अर्ज
तर श्रावणबाळ योजनेचे १४४ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. यासह इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे २८ अर्ज तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे १५ अर्ज मंजुर झाले असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या ३४ पात्र लाभार्थ्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात लंकाबाई अजिनाथ परहर यांना समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचे हस्ते २० हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित ३३ लाभार्थीच्या ६ लाख ६० हजार रुपयांचा धनादेश संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. तसेच दि १ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत कर्जत तालुक्यात विशेष सहाय्य योजना राबविण्यात आली होती त्या प्राप्त लाभार्थ्याच्या अर्जावर असून मार्च २०२२ मध्ये कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार आगळे यांनी दिली. सदर बैठकीस गटविकास अधिकारी अमोल जाधव, संगांयोचे नायब तहसीलदार प्रकाश मोरे, अव्वल कारकून बापूसाहेब सूर्यवंशी, मानसी निंबाळकर, विनायक सुरवसे यांच्यासह अध्यक्ष अमृत खराडे, बळीराम यादव, भाऊसाहेब गाडे, रामकिसन साळवे, बापूसाहेब नेटके उपस्थित होते.