देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 10 जानेवारी : अहिल्या : अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षाचे मंत्री उमेदवारांच्या विजयी करण्यासाठी जाहिसभा घेत आहेत.
पाणीपुरवठा आणि स्वछता मंत्री गुलाबरावपाटील शिवसेना (शिंदे ) गटाच्या उमेदवारांसाठी गांधी मैदान येथे प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी मंत्री पाटील बोलतांना म्हणाले, शिवसेना दहशतीला व दडपशाहिला घाबरत नाही. माझं अहिल्यानगर मधील राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाला चलेंज आहे. मी पाणीपुरवठा व स्वछता मंत्री असल्यामुळे अहिल्यानगर महानगर पालिकेची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. आणि श्रेय राष्ट्रवादीवाले घेत आहेत. हे म्हणजे असं झालं “पोरं आम्ही पैदा करायची, आणि बारसे तुम्ही घालायचे ”
अशी टिका त्यांनी आयोजित केलेल्या जाहीर सभेत केली. यावेळी व्यासपिठावर राज्य प्रवक्ते संजीव भोर, जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे, माजी गटनेते संजय शेंडगे, बाबुशेट टायरवाले, बाळासाहेब बोराटे, दिलीप सातपुते, गणेश कवडे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, माजी महापौर सुरेखा कदम, संभाजीराजे कदम, संदेश कार्ले, सचिन जाधव, अश्विनीताई, सचिन जाधव, दता जाधव, सुवर्णा जाधव, सचिन शिंदे, शाम (आप्पा ) नळकांडे, विक्रम राठोड, गोपाळराव झोडगे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, अभिजित भिंगारदिवे, नितीन शेलार, अमोल खामकर,काका शेळके, संगीता खरमाळे, शिवसेना महिला जिल्हा अध्यक्षा स्वाती जाधव, नरेंद्र कुलकर्णी, ओंकार सातपुते, दामोदर भालसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
जाहीरसभेचे प्रास्ताविक व नामदार पाटील यांचे स्वागत संभाजीराजे कदम यांनी केले. प्रास्ताविकात कदम म्हणाले, नगरशहर व शिवसेना हे एक समीकरण आहे. नगर शहराच्या जडणं घडणी मध्ये शिवसेनेचा मोठा वाटा राहिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी पुढे बोलतांना नामदार गुलाबराव पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे नाही आले तर काय झालं, मी आलो आहे, त्यांचा पठ्या, ते दाढीवाले मीही दाढीवाला, लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये देणारा लाडकाभाऊ, मुलींना मोफत शिक्षण देणारा, व तिच्या लग्नाची काळजी संपविणारा पहिला मुख्यमंत्री मंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. शिवसेनेमुळे माझ्यासारखा पान टपरीवाला, मंत्री झाला, रिक्षावाला मंत्री झाला हे फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच शक्य झाले. यावेळी बोलतांना ते म्हणाले,”आगे गाडी, पीछे गाडी, बिचमे बैठा गुलाबरावगडी” ही किमया बाळासाहेब ठाकरेंची आहे. अहिल्यानगर मध्ये मी शिवसेना सांगायला आलो नाही, कारण येथे आमचे मित्र स्वर्गीय आमदार अनिल भैय्या राठोडांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक आहेत. ” तुम्ही कितीही करारे हल्ला, लय मजबूत अहिल्यानगरच्या शिवसेनेचा किल्ला ” असे म्हणत त्यांनी उपस्थित मतदारांना त्यांनी गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे 39 व शिवसेना पुरस्कृत अशा 49 उमेदवारांच्या नावासमोरील धनुष्यबाण चिन्हा समोरील बॅटन दाबून मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसैनिक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा