राजकिय

प्रभाग क्रमांक 8 अ च्या अपक्ष उमेदवार सौ. भारती विकास वाघमारे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून जोरदार शुभारंभ! प्रभागात उमेदवारासह प्रचार फेरी

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : आहिल्यानगर, दि. 10 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. प्रचारात चांगलाच रंग भरू लागला आहे.
प्रभाग क्रमांक 8 अ च्या अपक्ष उमेदवार सौ. भारती विकास वाघमारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच दक्षिणमुखी विशाल मारुतीला नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.

रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, जिल्हा संघटक बेबीताई टकले, शहर अध्यक्षा सुनीता शिंदे, नेहा जावळे, सविता कवडे, आशा पठारे, विकास वाघमारे, अजय वाघमारे, संदीप घोरपडे, अविनाश बोरुडे, शंतनू लोखंडे, आदेश वाल्हेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोल्हेगाव, गांधीनगर, पितळे कॉलनी व प्रभागातील परिसरात प्रचार फेरी मारून गुरवार दि. 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सौ. भारती विकास वाघमारे यांच्या शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन प्रभागातील मतदार व नागरिकांना करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे