निधन

फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ, व भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ साहित्यिक नेते, कालकथित कवी, गायक वामनदादा कर्डक यांचे सहकारी माधवराव गायकवाड यांचे निधन!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 14 डिसेंबर : फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ व भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ साहित्यिक नेते आंबेडकरी चळवळीचे महान गायक, कवी कालकथित वामनदादा कर्डक यांचे सहकारी माधवराव गायकवाड यांचे वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने रात्री 2 वाजता दुःखद निधन झाले.
गायकवाड यांच्या निधनाने निलक्रांती चौक, शहरातील आंबेडकरी चळवळ व परिसरातील कार्यकर्ते नागरिक यांच्यामधून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर सम्यक निवास, सिव्हिल हाडको, गणेश कॉलनी पासून निघणार असून, निलक्रांती चौक येथे त्यांचे पार्थिव थोडया वेळ थांबणार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 12 वाजता अमरधाम येथे होणार आहे.
देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने व समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!🌹🌹🌹🌹🌹🌹

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे