महाराष्ट्र
स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उद्धव शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित, गुणिजन गौरव महासंमेलन, राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले. त्यात सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्यामुळे शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण ६ मार्च २०२२ रोजी पुणे येथे होणार आहे. सन्मानचिन्ह, गौरवपदक, महावस्त्र, मानपत्र, बॅच, फेटा असे पुरस्काराचे स्वरूप आहे.