गुन्हेगारी

अबब, चिंचोलीतून दोन महिन्यात तब्बल २५ विद्युतपंप गेले चोरीला, शेतकरी हवालदिल

बाळकृष्ण भोसले
राहुरी / प्रतिनिधी — तालुक्यातील चिंचोलीतील खडकडोह परिसरातील साई प्रवरा कंपनीसह शेतकऱ्यांच्या दोन महिन्याच्या कालावधीत तब्बल २५ विद्युतपंप चोरीला गेले आहेत वारंवार होत असलेल्या या चोरीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे तर पोलिसात फिर्याद देवूनही या चोरीच्या घटनांना आळा बसत नसल्याने ग्रामस्थांमधून संतापाचे वातावरण आहे
यासंदर्भात अधिक माहिती अशी की चिंचोली गावच्या शिवारात खडकडोह परिसर आहे प्रवरा नदीकाठी हा परिसर येतो प्रामुख्याने येथे नदीकाठी शेतकऱ्यांच्या विहिरी असून येथून आपापल्या शेताला पाणी नेण्यासाठी पाईपलाईन आहेत साधारण ३ ते साडेसात अश्वशक्तीचे पाणबुडी विद्युतपंप शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीत बसविले आहेत मात्र गत दोन महिन्यांपासून चोरट्यांनी हे विद्युतपंप लक्ष केले आहेत एका रात्रीत चार ते पाच विद्युतपंप केबल व पाईप कापून चोरटे चोरून नेत आहेत गटागटाने शेतकरी पहारा देत आहेत मात्र एखाददिवशी या शेतकऱ्यांची नजर चुकवत चोरटे डल्ला मारत आहेत तर येथेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक अशोक गागरे यांच्या मालकीच्या शेतात साई प्रवरा कंपनीच्या गोडाऊनचा पत्रा कापून त्यातील कंपनीच्या मशीनरीसाठी आणलेल्या ५ ते १० अश्वशक्तीच्या तब्बल ७ मोटारी चोरट्यांनी पळवल्या आहेत तर याच परिसरातील महावितरणचे रोहित्र चोरट्यांनी फोडून त्यातील ऑईल व तांब्याच्या तारा चोरुन नेल्या होत्या
अगोदरच वीजेचे भारनियमन वरुन रात्री-अपरात्रीचा वीजपुरवठा सोबत बिबट्याची दहशत भरिसभर डुकरांचे कळप या अनेकविध संकटाने शेतकरी राजा होरपळून निघाला आहे त्यात या चोरट्यांच्या या उद्वव्यापाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे दोन महिन्यात अशोक गागरे यांच्या ३, आण्णासाहेब काळे ३, भाऊसाहेब गागरे ३, सर्जेराव पठारे २, विनोद काळे २, दिपक नलगे २, रामभाऊ कातोरे १, किरण देशमाने १, गुलाब भोसले १ व साई प्रवरा ७ या शेतकऱ्यांचे विद्युतपंप चोरीला गेले आहेत
चोरीला गेलेल्या पंपाच्या ठिकाणी नवीन पंप आणून बसविला की तोही चोरटे पळवून नेत असल्याने केबल, पंप व पाईपच्या खर्चाने शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे कुठवर नवीन सामान आणणार हा प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे

गेल्या दोन महिन्यापासून विद्युतपंप वारंवार चोरीला जात आहेत बिबट्याच्या दहशतीमुळे राखण करायचे कुठपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांचे या खर्चामुळे अक्षरशः मरण झाले आहे अगोदरच वीजेचा खंडीत व अनियमित वीजपुरवठा यात चोरट्यांचा धुमाकूळ यामुळे पिके वाळून चालली आहे पोलिसांनी शोधमोहीम राबवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा
– अशोक गागरे, शेतकरी

सदर विद्युतपंप चोरी प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तीन अंमलदारांची चौकशी समिती नेमली असून ते घटनेच्या तांत्रिक बाबी तपासून लवकरात लवकर चोरीचा तपास पुर्ण करतील
दरम्यान शेतकऱ्यांनी चोरी होत असलेल्या विद्युतपंप व अन्य वस्तूंच्या बाबतीत पोलिस ठाण्यात आवर्जून गुन्हे दाखल करावेत
– प्रताप दराडे पोलिस निरीक्षक, राहुरी

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे