. मिलींद गायकवाड यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार

पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
राज्यस्तरीय कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्या वतीने मिलींद गायकवाड (सर) यांना राज्यस्तरीय आदर्शकला शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.
ते ग्रामीण भागातिक हे शिक्षक असुन न्यू इंग्लिश स्कुल आदिनाथनगर शाळेवर ते कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते कलेची जोपासना करत आहेत. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले अनेक कलाकार घडले आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमात ते चित्र प्रदर्शने देखिल करत असतात.त्यांच्या क्रांतिज्योति युवा प्रतिष्ठान आल्हणवाडी संस्थेच्या माध्यमातुन ते विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखिल करत असतात, याचिच दखल घेत त्यांना (आंतराष्ट्रीय किर्तीचे वास्तुतज्ञ) मा. डॉ. रविराज आहार (सुप्रसिद्ध गायक व शाहीर) नंदेश उमप (जेष्ठ अभिनेते ) जयराज नायर ( कर्करोग शास्त्रज्ञ)अमजद खान असदखान पठाण तसेच पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा सायबर सुयोग तुकाराम अमृतकर (मा. उपसंचालक शिक्षण विभाग पुणे) सुरेश बी. माळी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे,सरपंच मोनाली ताई राजळे, जि.प.सदस्य राहुल राजळे,मुख्याध्यापक बाळासाहेब ताठे सर व सहकारी शिक्षक पत्रकार वजीर शेख नवगिरे सर माजी सरपंच-मच्छिंद्रनाथ गव्हाणे
गायकवाड आण्णासाहेब गुरुजी, संपत गायकवाड (मा सरंपच), दिलीप गायकवाड गुरुजी, सतिष डॉ. गायकवाड आणि अनेक माध्यमातून अनेक लोकांकडून, मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.