राजकिय

लोहगाव सेवा संस्थेची निवडणूक अखेर बिनविरोध

पत्रकार नेहे सह मान्यवरांना संधी

राहुरी / प्रतिनिधी — राहाता तालुक्यातील प्रामुख्याने प्रगत समजल्या जाणाऱ्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची अखेर बिनविरोध निवडणूक झाली आहे
या संस्थेच्या १२ जागांसाठी एकंदर २६ अर्ज दाखल झाले होते १४ जणांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आर बी सदाफळ व सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेंद्र वसंतराव चेचरे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील माजी आ. अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व ज्येष्ठ मार्गदर्शक केेेरूनाथ चेचरे यांचे विशेष सहकार्य लाभले बिनविरोध संचालकांमध्ये राजेंद्र केरूनाथ चेचरे, गणेश भाऊसाहेब चेचरे, विजय हरिभाऊ चेचरे, राजेंद्र चंद्रभान चेचरे, बाबासाहेब हौशीराम चेचरे, किरण अण्णासाहेब चेचरे, किशोर हौशिराम दरंदले, कोंडीराम परसराम नेहे, महिला राखीव सौ पुष्पलता बाबासाहेब चेचरे, सौअनिता किशोर तुरकणे, इतर मागास प्रवर्ग मधून किरण रघुनाथ इनामके, भटक्या विमुक्त जाती मतदार संघातून लक्ष्मण नामदेव तांबे यांची बिनविरोध निवड झाली बिनविरोध निवडणूक झाल्याबद्दल कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे, भास्करराव चेचरे, बबनराव चेचरे, गणपत चेचरे, दत्तात्रय चेचरे, धुळाजी चेचरे, लक्ष्म्मण चेचरे, विजय दरंदले, गोरक्ष गोपाळे, प्रवीण चेचरे, दिलीप इनामकेे, कृष्णा चेचरे, बबन दरंदले, विजय चेचरेे, गिरमे आशिष, गिरमे रमेश, बळीराम चेचरे, किरण दरंदले, बाळासाहेब चेचरे, अनिल चेचरे, संजय चेचरे, अरुण चेचरे, प्रभाकर चेचरेे, राहुल चेचरे, अशोक चेचरे, किशोर तुरकणे, आदींनी अभिनंदन केले निवडणुकीत समझोता एक्सप्रेस सुपरफास्ट धावली असल्याचे राजकीय जाणकारांनी मत व्यक्त केले नवनिर्वाचित संचालकांचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे