ब्रेकिंग

एक कोटीच्या बनावट नोटांसह तीन जणांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दिनांक 24/08/2025 रोजी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी मोबाईल फोनद्वारे माहिती कळविली की, दौड कडुन नगर शहराकडे एका पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इरटीगा क्र. MH-12- SU.-2317, आणि सिलव्हर रंगाची मारुती सुझुकी स्वीफ्ट गाडीमध्ये काही इसम व एका मोटार सायकल वर दोन इसम असे त्यांच्याकडे असलेल्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करुन त्याबदल्यात ख-या नोटा घेवुन फसवणुक करणारी टोळी, व्यवहार करण्याकरीता येत आहे. त्यांचेवर कारवाई करावी असे कळविल्याने, सपोनि/ हरिष भोये व पोहेकॉ/सुनिल पवार, सुरेश माळी, दिपक घाटकर, हदय घोडके, पोना/ भिमराज किसन खर्से, पोकॉ/ आकाश काळे, अमोल कोतकर, बाळु खेडकर, मनोज साखरे, चालक सफौ/उमाकांत गावडे असे स्थानिक गुन्हे शाखाचे पथक नगर दौड रोडवरील कायनेटीच चौकापासुन दौड रोडने सुमारे 200 मी.अंतरावरील हनुमान मंदिराचे जवळ सापळा रचुन दौंडकडुन येणारे पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इरटीगा नंबर पाहिला असता तो क्र. MH-12- SU.-2317 मध्ये असलेले 1) इंद्रजित बिबीशन पवार वय 29 रा. शांतीनगर, भोसरी, ता.हवेली, जि. पुणे (2) दिपक राजेंद्र भांडारकर वय 32 रा. शांतीनगर, भोसरी ता. हवेली,जि. पुणे (3) शरद सुरेश शिंदे वय 29 रा. वरंवडी, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले व त्याच वेळी मोटार सायकल वरील दोन इसम व स्विप्टगाडीमधील 3 इसम पळुन गेले आहे.
पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी व चारचाकी वाहनाची अंगझडती घेऊन त्यांचे ताब्यातुन एकुण 9,57,000/- रुपये किमतीचे भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसनाऱ्या 500 रु. दराच्या 12 नोटा व त्याखाली भारतीय बच्चो का बैंक 500 रुपये असे छापलेले प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा असलेले 12 बंडल , तसेच 88 भारतीय बच्चो का बैंक, 500 रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा, तसेच 20 भारतीय बच्चो का बैंक 200 रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा, एक मारुती सुझुकी इरटिका गाडी, एक टीव्हीएस स्टार कंपनीची मोटार सायकल व 04 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपीची चौकशी केली असता, त्यांनी पळुन गेलेले इसम पैकी एकाचे नाव (1) जितेंद्र ममता साठे रा. वासुदे, ता. पारनेर जि. अहिल्यानगर असे सांगितले व इतर 04 इसमांना ओळखत नसल्याबाबत माहिती दिली. तसेच त्यांची एक गॅग असुन ते नेहमी त्यांचे कब्जात बनावट नोटा बाळगुन ते खरे आहेत असे लोकांना भासवुन त्यांना बनावट नोटा देवुन आर्थिक व्यवहार करुन फसवणुक करत असतात. तसेच त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्याने दोन दिवसापुर्वी कोपरगांव जि. अहिल्यानगर येथे सुमारे 7 लाख रुपये किमंतीच्या बनावट नोटा दिले असल्याचे सांगितले आहे. नमुद आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 179 ,180,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.
तरी अशा प्रकारे कोणाची फसवणुक झाली असले, तर त्यांनी संबधीत पोलीस स्टेशनला तक्रारी देण्याचे अहवान करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे