ब्रेकिंग

6अवैध दारु अड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडुन छापे! 50,980/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: दि. 24 ऑगस्ट : अहिल्यानगर: मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/राहुल द्वारके, पोहेकॉ/गणेश लबडे, पोहेकॉ/ सुयोग सुपेकर, पोना/रिचर्ड गायकवाड, पोना/सोमनाथ झांबरे, रोहीत येमुल, पोकॉ/अमोल अजबे, पोकॉ/ प्रकाश मांडगे, पोकॉ/योगेश कर्डीले, मपोकॉ/सारिका दरेकर चालक पोकॉ/अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
दिनांक 23/08/2025 रोजी पथकातील पोलीस अंमलदार यांनी अहिल्यानगर तालुका व सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध देशी विदेशी दारु विक्रेत्यांची माहिती काढुन 6 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. कारवामध्ये अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द एकुण 6 गुन्हे दाखल करुन आरोपीचे ताब्यातुन 50,980/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलीस स्टेशन निहाय कारवाई खालील प्रमाणे
अ.नं. पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यांची संख्या जप्त मुद्देमाल किंमत
1 अहिल्यानगर तालुका 2 8,480/-
2 सोनई 4 42,500/-
* एकुण 6 50,980/-
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे