प्रशासकिय
अंमली पदार्थ विरोध दिन, व सायबर गुन्हेबाबत स्वातंत्र्य दिनानिमित्त अहमदनगर महाविद्यालय येथे सायबर गुन्हे शाखेने केली जनजागृती


यावेळीअहमदनगर महाविद्यालयातील एनसीसी विध्यार्थी यांना सायबर गुन्हे कसे घडतात, गुन्हेगार कोण कोणत्या पद्धतीने आपली वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करतात, याबाबत सायबर गुन्हे शाखेने अनेक उदाहरणे देत आपली फसवणूक होऊ नये, म्हणून आपण स्वतः काय काय काळजी घेतली पाहिजे. याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अंमली पदार्थामुळे होणारे परिणाम व त्यावर प्रतिबंधाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी एनडीपीएस कायद्याची आयटी ॲक्ट याबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रत्येक कलमाला किती शिक्षा आहे हे देखील मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 60 ते 70 एनसीसी कंडेट व त्यांचे प्रशिक्षक श्री. जाधव सर हजर होते.