देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर: दि. 15 ऑगस्ट प्रतिनिधी :-राज्यात गाजलेल्या नगर शहरातील रेखा जरे हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.रेखा जरे यांचा खून करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपीला जुलै महिन्यात तात्पुरता स्वरूपाचा जमीन मंजूर झाला होता.आता नियमितचा जामीन मंजूर झाला आहे. संभाजीनगर हायकोर्टात जामीनासाठी ऍड सुनीता सोनवणे यांनी आरोपी सागर भिंगारदिवे यांच्या वतीने युक्तिवाद केला. युक्तिवादा नंतर संभाजीनगर हायकोर्टाने सागर भिंगारदिवे यांना जामीन मंजूर केला आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा