देशस्तंभ ऑनलाइन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि: 11 ऑगस्ट : महाराष्ट्रात शिवसेना व रिपब्लिकन सेना युती झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार असल्याचे मत शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव यांनी व्यक्त केले.शिवसेना रिपब्लिकन सेना पदाधिकारी कार्यकर्ते यांचा अहिल्यानगर शहरात नुकताच संवाद मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना जाधव म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांना एकजुटीने सामोरे जाऊ यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हा संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संभाजीराजे कदम, दिलीप सातपुते, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, गणेश कवडे,दत्तात्रय कावरे, आप्पा नळकांडे, सुरेश तिवारी, दीपक खैरे, प्रशांत गायकवाड, महेश लोंढे,दामोदर भालसिंग, रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडी शहराध्यक्षा सुनीता शिंदे, जिल्हा संघटक बेबीताई टकले, शहर उपाध्यक्षा नेहा जावळे, बाळासाहेब कसबे, युवक जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे, सविता कवडे, बाळासाहेब गायकवाड, संजय ताकवले, गणेश परहार, गणेश कोकडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जाधव म्हणाले या युतीमुळे कार्यकर्त्यांना आनंद झाला असून महानगरपालिकेवर भगवा आणि निळा फडकवू असे ते म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे हे बोलताना म्हणाले या युतीच्या माध्यमातून बहुजन समाज एकवटला जाणार आहे या युतीच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून येणार असल्याची भावना त्यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे हे बोलताना म्हणाले, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज साहेब व महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतलेला निर्णय बहुजन समाजासाठी महत्त्वाचा ठरला आहे आमच्याकडे सत्ता आणि पैसा नाही पण अन्यायाविरुद्ध संघटन उभा करून लढण्याची ताकद आहे शिवसेना व रिपब्लिकन सेना दोन्ही लढणाऱ्या संघटना आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच फायदा होणार असल्याची त्यांनी सांगितले.संवाद मेळाव्याचे सूत्रसंचालन महेश भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल भिंगारदिवे यांनी व्यक्त केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा