देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर: दि. 13जुलै (प्रतिनिधी)- अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 जणांच्या सोन साखळ्या व खिशातील पकिटांवर डल्ला मारणारे चोरटे 1 वर्ष होऊनही मोकाटच फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. या बाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की 4 जून 2024 रोजी शिर्डी आणि नगर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एमआयडीसी येथील वखार महा मंडळाच्या गोडाऊन मध्ये झाली. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठया प्रमाणात गर्दी होती. निवडून आलेल्या उमेदवाराची विजयी मिरवणूक निघाली, या मिरवणूकित मोठी गर्दी होती, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी 12 जणांच्या सोन्याच्या चेन व खिशातील पैशाची पाकिटे चोरली गेली, ही बाब तक्रारदारांच्या लक्षात आल्यावर तक्रारदारानी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या, याबाबतीत राजेंद्र वसंत शिंदे ( रा.पाथर्डी) याला संशयित गुन्हेगार म्हूणन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर संशयित गुन्हेगारांचे अनेक फोटो व व्हिडीओ स्वरूपातील पुरावे एमआयडीसी पोलिसांना सादर करण्यात आले. सदर घटना घडल्यानंतर पोलिसांचा तपास अगदी शून्य गतीने सुरु असल्याचे लक्षात येताच पीडितानी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत तपासा बाबत नाराजी व्यक्त केली होती. याच दिवशी 4 जून रोजी खासदार उदयन राजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीत देखील असाच काहीसा प्रकार झाला होता. तिथे 27 लाख 78 हजारांच्या सोन्याच्या साखळया चोरट्यानी लंपास केल्या होत्या, त्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात चोरीस गेलेले सोने हस्तगत करत चोरट्याना जेरबंद केले होते. सातारा पोलिसांना जे जमले ते एमआयडीसी पोलिसांना का जमत नाही? असा प्रश्नही रिपब्लिकन सेनेने उपस्थित केला आहे. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, सुनीता शिंदे, नेहा जावळे, बेबीताई टकले, विवेक विधाते विकास रणदिवे, सत्यवान नवगिरे, संजय ताकवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच 12 जणांच्या सोन्याच्या चेन चोरी गेलेल्या असतांना 12 जणांची फिर्याद घेण्या ऐवजी फक्त दोनच जणांची फिर्याद का घेण्यात आली, या बाबत एमआयडीसी पोलिसांच्या कार्य पद्धतीवर संशय व्यक्त होत आहे.
सदर घटनेचा तपास लवकर होत नसल्याने घटनेच्या सहा महिन्यानंतर दि. 20 डिसेंबर 2024 रोजी एमआयडीसी पोलिसां कडून स्थनिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग करावा,असे पत्र पीडिताकडून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले होते. या गंभीर घटनेच्या बाबतीत रिपब्लिकन सेनेने नुकतीच शहरविभागाचे पोलीस उप अधीक्षक डॉ. अमोल भारती यांची भेट घेत सर्व पुरावे सादर करत गुन्ह्याचा तपास करणारे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी व आरोपीचा शोध घेणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत गुन्ह्यातील तपास अधिकारी, व गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करत निलंबित करावे. व तपास एलसीबी कडे वर्ग करण्यात यावा. सदर प्रकरणी लवकर पीडिताना न्याय मिळाला नाही, तर मुबंई येथे जाऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देखील भेटणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा