अवघ्या दीड महिन्यानंतर सुखसागर हॉटेलची जागा मनपाच्या ताब्यात देणार असल्याचा हमीपत्र हॉटेल चालकाने दिले मनपा आयुक्तांना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्यदिव्य स्मारकाचा अडथळा दूर..

अहमदनगर (प्रतिनिधी) – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्केटयार्ड चौक येथे पूर्णकृती पुतळ्याचे भव्य दिव्य स्मारक उभारावे अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली होती. अहमदनगर मनपा व हॉटेल सुखसागर यांच्यातील वाद हा कोर्टात होता परंतु काल कोर्टाने महापालिकेला कौल दिला त्यानंतर आंबेडकरी समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालते परंतु आज सकाळी हॉटेल सुखसागर मालकाने उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला व जागा खाली करून देण्यासाठी अवघ्या दीड महिन्याची मुदत घेतली व त्यानंतर शहराचे आमदार संग्राम जगताप तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये अवघ्या दीड महिन्यानंतर हॉटेल सुखसागरचा ताबा महापालिकेला दिला जाईल, असे लेखी आश्वासन हॉटेल चालकाने देण्याचा निर्णय घेतला व त्या निर्णयानुसार त्यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना लेखी दिले की अवघ्या दीड महिन्यात हॉटेल सुखसागर खाली करून त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक उभारावे आमचा कोणताही विरोध नाही. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो असे लेखी आश्वासन हॉटेल चालकाने दिल्यानंतर आंबेडकरी समाजाने या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, बंडू आव्हाड, प्रतीक बारसे, सुशांत मस्के, सिद्धार्थ आढाव, संजय कांबळे, वैभव भिंगारदिवे, कौशल गायकवाड, विजय गायकवाड, नगरसेवक प्रशांत गायकवाड आदीसह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.