अहिल्यानगर : दि. 24 (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघातून आमदार संग्राम जगताप मोठया मतांनी निवडून आले. याबाबत आमदार संग्राम जगताप यांचे अभिनंदन करण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भेट घेत, आयुर्वेद महाविद्यालय येथे अरुण काका जगताप यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलतांना माजी आमदार अरुण काका जगताप म्हणाले तुम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले, यावेळी जेष्ठ नेते सुनील शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे यांनी आम्हाला सहकार्य केले असल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी आमदार संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा आमदार झाल्यामुळे यावेळी नक्कीच मंत्री होतील अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सुनील राऊत, विजय वडागळे, पै.चंद्रकांत औशिकर, महेश भोसले, संजय ताकवले, राजेंद्र साळवे मेजर,आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा