राजकिय

लाडक्या बहिणीच्या नारीशक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्ती मुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.24 महाराष्ट्रात महायुती चा महाविजय झाला आहे. राज्यात लाडक्या बहिणीची नारी शक्ती ; सर्व समाज घटकांचा कौल महायुतीला मिळाला त्यासोबत दलित बौद्ध आंबेडकरी जनतेने महायुतीला भरघोस मतदान केल्या मुळे महायुती चा ऐतिहासिक विजय झाला आहे. नरेंद्र मोदींनी केलेला आहे देशाचा विकास; त्यामुळे दिसत आहे महायुतीच्या विजयाचा विकास; आज आम्हाला दिसत आहे निळ निळ आकाश ; महाविकास आघाडी झाली आहे भकास अशी चारोळी सादर करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या ऐतिहासिक विजयाचे स्वागत केले आहे .महायुती च्या सराव घटका पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आल्यानेच महायुतीला अभूतपूर्व यश लाभल्या बद्दल ना.रामदास आठवले यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि राज्यभरातील जनतेचे आभार मानले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला. त्यामूळे जनतेच्या डोळ्यात खोट्या प्रचाराची धूळफेक करणाऱ्या महाविकास आघाडीला जनतेने पराभवाची धूळ चारली आहे .लाडकी बहिण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीला महिलांनी चांगलाच धडा शिकवून महायुतीला ऐतिहासिक विजयाची भाऊबीज भेट दिली आहे असे सांगत ना.रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत.
बांद्रा येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर रिपब्लिकन पक्षाक्या वतीने महायुती चा महविजय ढोल वाजवून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला यावेळी ना.रामदास आठवले यांनीही ढोल वाजवून महायुती चा विजय साजरा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन ना.रामदास आठवले यांनी महायुती च्या तिन्ही नेत्यांचे अभिनंदन केले.
10वर्षामध्ये 10 लाख कोटी पेक्षा जास्त पैसे महाराष्ट्राच्या विकासासाठि केंद्राकडून मिळाले आहेत.नरेंद्र मोदीजींनी गरिब,युवा,महिला,दलित,आदिवासी आणि ओबीसी या सर्वासाठी काम केलेले आहे.या महाराष्ट्रातील जनतेले भरभरुन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे.एकतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीच्या पध्दतीने माननीय नरेंद्र मोदीजींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणुन टोमणे मारण्यात आले होते आणि त्यांचा परिणाम म्हणुन संजय राऊत सारखे जे नेते होते त्यांनी सातत्याने चुकीच्या पध्दतीने बोलत हाते.त्यामुळे लोकांनी ठरविले की महाविकास आघाडीला धडा शिकवण अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे महाविकास आघाडीला एक मोठा धडा शिकवण्यात आला आहे. महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केलेल आहे.आम्हाला अपेक्षा होती 170 जांगा मिळतील पण त्यापेक्षा जास्त 60 जागा जास्त मिळाल्या आहेत. महायुतीच सरकार एक-दोन दिवसा मध्ये स्थापन होईल.संजय राऊत आणि महाविकास आघाडिच्या नेत्यांना दुसरा काही धंदा नाही आहे.त्यामुळे त्यांना फक्त आरोप करण्याचाचा धंदा आहे .त्यामुळे ईथला मतदार राहिला नाही अंधा आणि महाविकास आघाडीचा हाच आहे धंदा त्यामुळे त्यांचा हाच धंदा असल्यामुळे लोकांनी त्यांना शिकवल आहे राजकारणा मध्ये कसे बोलले पाहिजे. अशा पध्दतीच उलट-सुलट बोलुन तुम्हाला मत पडणार नाही हे लोकांनी त्यांना दाखवून दिल आहे. संजय राऊत म्हणतात त्यांना हा निर्णय मान्य नाही. तुमच्या एवढ्या जागा निवडुन आल्या लोकसभेमध्ये तुमच्या 21जागा निवडूण आल्या आमच्या17 जागा मशीन मध्ये काहीतरी गडबडी खराबी केली आहे. लोकशाही मध्ये पराभव स्विकारण हिच खरी लोकशाही आहे.संजय राऊत यांना लोकशाही मान्य नसेल,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मान्य नसेल तर संजय राऊत यांना या देशात राहण्याचा अधिकारच नाही.संजय राऊत चांगले माझे मित्र आहेत ते सामना चे संपादक आहेत, अत्यंत चांगले लेखक आहेत.अशा माणसाने आता निकाल आल्या नंतर ही जर त्यांना ते मान्यं नाही आहे म्हटल्यावर ते अयोग्य आहे. अशा पध्दतीच्या त्यांचा व्यक्तव्यामुळेच त्यांच मोठ नुकसान झाल आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे