अहिल्यानगर दि. 23 नोव्हेंबर (प्रतिनिधी )अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघांचे महायुती अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
या निवडणुकीत त्यांची प्रमुख लढत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्याशी होती, आमदार संग्राम जगताप यांना 1,17055 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमदेवार आभिषेक कळमकर यांना 78255 मते मिळाली. आमदार संग्राम जगताप यांना 39650 मताधिक्कय मिळाले आहे.
एकंदरीतच नगरच्या जनतेने आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामाला प्राधान्य दिल्याचे या निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले. थोडक्यातच आज नगर शहराच्या चौकात नागरिकांमधून नगरकरांच्या मनात होता विश्वास जुना! म्हणूनच तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले, आमदार संग्राम जगताप पुन्हा! अशाच चर्चा ऐकावयास मिळत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा