अहमदनगर दि. 24 ऑगस्ट (प्रतिनिधी ) नगर शहरात शुक्रवार दि. 23रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला,
नगर कल्याण रस्त्यावर असणारा पूल पूर्ण पाण्याखाली गेला असून, याप्रसंगी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी महानगर पालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, माजी उप महापौर गणेश भोसले, अविनाश तात्या घुले, त्याच प्रमाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बोरसे व कर्मचारी उपस्थित होते यावेळी आमदार जगताप यांनी पूर परिस्थिती बाबत योग्य त्या सूचना केल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा