अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यात गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की ,राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात गोळीबाराची घटना घडली असून गावठी कटटयातुन गोळी झाडुन एकाचा खुन करण्यात आला. आहे.प्रदिप एकनाथ पागिरे असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव असुन पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळी ही घटना घडली हा प्रकार कशातुन घडला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.