वाड्या-वस्त्यावर जलवाहिनीतून मोफत शुद्ध पाणी मिळणार :बाळासाहेब हराळ
पंचायत समितीच्या माध्यमातून पंधरा लाख रुपये खर्चाच्या कामाचा प्रारंभ!

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे पाणी शुद्धीकरणार प्रकल्प उभा राहणार आहे . या प्रकल्पमुळे ग्रामस्थांना मोफत शुद्ध पाणी मिळणार आहे. पाणी योजना झाल्यानंतर वाड्या-वस्त्यावर जलवाहिनीतून मोफत शुद्ध पाणी मिळणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी सांगितले.
गुंडेगाव ( ता. नगर ) येथे पंचायत समितीचे सदस्य रविंद्र भापकर यांच्या निधीतून शुद्ध पाणी योजने प्रकल्प, स्वच्छतागृहासाठी प्रत्येकी पाच लाख व अंतर्गत भुयारी गटारची कामाचा प्रारंभ वेळी ते बोलत आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून पंधरा लाख रुपये खर्चाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लागला आहे. अंतर्गत भुयारी गटारीमुळे सांडपाणी साचण्याचा प्रश्न सुटला आहे.
रविंद्र भापकर , संजय कोतकर, शिवनाथ कोतकर, सुनील भापकर, वामनराव जाधव, बाजीराव चौधरी, गणपत हराळ, पांडुरंग हराळ, अंबादास जाधव, पोपट तांबे, चंद्रकांत निकम यावेळी उपस्थित होते.