अहमदनगर दि. 2 ऑगस्ट (प्रतिनिधी ) “जग बदल घालूनी घाव,मज सांगुन गेले भीमराव ” या विचारांचे जनक ‘ शाहिरी डाफावर थाप मारून संयुक्त महाराष्ट्र व आंबेडकरी चळवळ घरा घरात पोहचविणारे, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानणारे थोर समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती नुकतीच नगर शहरात साजरी करण्यात आली. माळीवाडा भागातील वर्ल्ड किंग ग्रुपच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंती निमित्त पुष्पाहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अविनाश वानखेडे, आकाश कदम, प्रमोद थोरात, नितीन कदम, अक्षय कदम, त्याचप्रमाणे परिसरातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणानी परिसर दुमदमून गेला होता.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा