संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द येथे गेल्या दोन वर्षापासून पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने नागरिक वर्गांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून नागरिकांनी गेल्या दोन वर्षापासून पंचायत समिती संगमनेर यांच्याकडे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अनेक वेळा पूर्ण वेळ ग्रामसेवकाची मागणी केली आहे परंतु प्रशासनाचे लोकप्रतिनिधींनी या नागरिकांच्या मागणीकडे पूर्णपणे काना डोळा केला असून नागरिक वर्गांना गेल्या अनेक महिन्यापासून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दाढ खुर्द गाव हे अडीच तीन हजार लोकसंख्येचे गाव असून या गावाचा विस्तार वाडी वस्तीवर जास्त असून प्रगत शेती असल्याने येथे बागायती जमीन आहे.
तसेच येथे शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या मोठी असल्याने नागरिकांना रहिवासी दाखले आधार दुरुस्ती विवाह नोंदणी जन्माची दाखले मृत्यूची दाखले नवीन घराच्या नोंदी जुन्या घराच्या नोंदी दुरुस्ती करणे न हरकत प्रमाणपत्र आधी महत्त्वाच्या कामासाठी तसेच विविध लाभाच्या योजना घरकुल योजना रमाई आवास योजना समाज कल्याण च्या महिला बालकल्यांच्या विविध योजना अपंग कल्याण विकास योजना आदी महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जा ये करावी लागते वाडी वस्तीवरून पाय पायी ग्रामपंचायतीकडे यायचे आणि येथे येऊन ग्रामसेवक भाऊसाहेब भेटत नाही.
त्यामुळे नागरिक संतापले असून येत्या काही दिवसांमध्ये प्रशासनाने कामकाजामध्ये दुरुस्ती न केल्यास व पूर्ण वेळ ग्रामसेवक न दिल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकले जाईल असा इशारा काँग्रेसचे अश्वी गटाचे गटनेते किशोर भाऊ जोशी तसेच शिवसेनेचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्ह्याचे नेते किशोर भाऊ वाघमारे भारतीय लहुजी सेनेचे दगडू भाऊ साळवे माळी महासंघाचे नितीन पाबळे संत शांत्रे अधिक कार्यकर्त्यांनी दिला असून दाढ खुर्द या गावांमध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी ग्रामसेवकाची प्रशासकीय बदली झाली असून दाड खुर्द गावामध्ये अंतर्गत तीन राजकीय गट असून छोट्या-मोठ्या राजकीय संघटना व त्याचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असून दाढ खुर्द गावामध्ये अंतर्गत गटातटाच्या राजकारणामुळे येथे ग्रामसेवक येण्याची इच्छुक नाही त्यातल्या त्यात नागरिकांच्या मागणीनुसार गावाला ग्रामसेवक भेटले परंतु संबंधित ग्रामसेवकाकडे चार मोठाल्या गावाचा अतिरिक्त कारभार असल्याने त्यांच्याकडे हे जे गाव आहे दार खुर्द हे छोटे आहे. त्यामुळे भाऊसाहेब हे या गावाकडे यायला त्यांना वेळच नसतो आले तरी ते दोन-तीन तासाच्या पुढे गावामध्ये नागरिकांची भेट होत नाही दोन-तीन तास आल्यानंतर त्यांच्या अवतीभवती सरपंच व सदस्य नेहमी गजबजलेल्या नागरिकांची गर्दी असते त्यामुळे सामान्य नागरिकांना ग्रामसेवक भाऊसाहेब यांची भेट घेण्यास व आपल्या कामाची विचारपूस करण्यास वेळच भेटत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होत असून येथील ग्रामसेवक भाऊसाहेब यांचे बाकीच्या गावाचे अतिरिक्त कारभार कमी करून फक्त दाढ खुर्द गाव हे गटविकास अधिकारी संगमनेर यांनी त्यांच्याकडे ठेवावे व सोमवार ते शुक्रवार पाच दिवस दाढ खुर्द गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक देवा अशी नागरिकाची मागणी असून दाढ खुर्द ग्रामपंचायत सध्याची अवस्था ही ग्रामपंचायत आहे सरपंच चालवत असून येथील दोन शिपाई यांच्यावर ग्रामपंचायतचा कारभार अवलंबून असून येथील क्लर्क या प्रसूती रजेवर असल्यामुळे येथील ऑनलाइन चे कामकाज हे पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे दाढ खुर्द ग्रामपंचायत अवस्था असून अडचण व नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने येथील नागरिकांची मागणीनुसार पूर्णवेळ ग्रामसेवक तात्काळ गावाला द्यावा अशी मागणी नागरिक वर्गणी संगमनेर गट विकास अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा