माध्यमिक विद्यालयाचे केले कॉल सेंटर शिक्षकांचा अजब कारभार
खारे कर्जुने गावातील पालकां मध्ये असंतोष
नगर (प्रतिनिधी) नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथे माध्यमिक विद्यालय शिक्षकांकडून एक खाजगी लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी विद्यालयाचे अक्षरशः कॉल सेंटर केले असल्याचे चित्र आहे.शिक्षकांच्या या अजब कारभारा विषयी पालकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे.
याबातची माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील खारे कर्जुने गावातील लोकहितवादी शिक्षण प्रसारक मंडळाचे देवराम गंगाराम पाटील माध्यमिक विद्यालय येथील 8 वी 9 वी 10 वी च्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांकडून खाजगी लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांकडून फोन करून आमंत्रण देण्यात दबाव निर्माण येत आहे.
गटातील व गनातील व गावागावातील ग्रामपंचायत सदस्य यांना विद्यार्थ्यांकडून फोन करून आमंत्रण देण्यात आले. हि बाब जेव्हा पालक संजू भाऊ बोरूडे यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षक यांना जाब विचारला की शाळेती विद्यार्थ्यांकडून तुम्ही खाजगी लग्नाचे आमंत्रण कसे काय दिले?
तेव्हा शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आमची चुक झाली असे बोलुन दिलगीर व्यक्त केली. तेव्हा बोरूडे यांनी मुख्याध्यापक सांगितले की मी आपणावर शाळेतील विद्यार्थ्यांकडून खाजगी लग्नासाठी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणा साठी दिलेल्या मोबाईल वरून समधित गटातील व गणातील पद अधिकारी व गण गटातील ग्रामपंचायत सदस्य यांना आमंत्रण देण्यासाठी भाग पाडले.
बोरूडे हे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व दोषी मुख्याध्यापक व शिक्षक यांना त्वरित निलंबित करण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी यांना देणार आहे असे सांगितले.
याबाबत चाईल्ड लाईन व सायबर क्राईम अंतर्गत शाळेत विद्यार्थ्यांकडून असे खाजगी कामे करून घेतल्या कारणी गुन्हे दाखल करण्यात यावे असे पत्र आपण देणार असल्याचे बोरुडे यांनी सांगितले.