राजकिय
आरपीआय (गवई) च्या शहराध्यक्षपदी ज्योती पवार

नगर (प्रतिनिधी)सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पवार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) महिला शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शहरातील नागापूर परिसरात झालेल्या रिपाईच्या कार्यक्रमात पवार यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष नईम शेख, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, आम्रपाली साळवे उपस्थित होते.
केंद्रातील भाजप सरकारच्या काळात जातीवाद, महागाई, शेतकर्यांवर अन्याय व शासकीय अनागोंदी माजली असून, या हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात लढा देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे विचाराने चालणार्या पक्षामागे उभे राहण्याचे आवाहन रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले.