अचानक शाळाभेटी तपासणीत जामखेड तालुक्यातील “या” जिल्हा परिषद प्राथामिक शाळेतील तीन शिक्षक गैरहजर

जामखेड (प्रतिनिधी) :- जामखेड तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्गाच्या संयुक्त पथकाने शुक्रवार दि. २५ / ८ / २३ रोजी सकाळी मोहा , साकत या शाळांना अचानक भेटी देऊन तेथील शिक्षक उपस्थितीची तपासणी केली असता मोहा जिल्हा परिषद शाळेतील तीन शिक्षक श्री . विजय जाधव , श्री रजनिकांत साखरे , श्रीम.प्रतिमा पवार हे शिक्षक शालेय कामी गैरहजर असल्याचे दिसून आले .
याबाबत सविस्तर माहीती अशी की, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक अहमदनगर यांचे अचानक शाळा भेटीच्या आदेशानुसार तालूका गटशिक्षणाधिकारी श्री . बाळासाहेब धनवे , शिक्षण विस्तार अधिकारी श्री .चव्हाण , केंद्रप्रदुख श्री .पारखे यांच्या संयुक्त पथकाने मोहा व साकत जिल्हा परिषद शाळांना अचानक भेटी दिल्या त्यावेळी ही बाब उघडकीस आली.
बऱ्याच वेळा ज्या दिवशी दुपारी शिक्षणपरिषद असते त्या वेळी सकाळी किंवा शनिवार ची सकाळची शाळा असल्यास काही ठराविक शाळेतील शिक्षक शालेय कामी नेहमी गैरहजर राहत असल्याची ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे येथून पुढेही अचानक शाळा भेटी होणार असल्याने कामचुकार शिक्षकांचे धाबे दणानले असून .
गैरहजर शिक्षकावर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.