सामाजिक
“बा भीमा खातो तो घास, अन जगतो तो श्वास फक्त तुमच्या मुळेच! ” ” भीमराया तुमच्याच प्रेरणेने घडणार नवा इतिहास” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा सन्मानाने महानगर पालिकेच्या स्वाधीन


रविवार दि. 27 जुलै 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा कृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रमुख पुढाकाराने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, व पालक मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित संम्पन्न होत आहे.
याच पार्श्वभूमीवर सन 1961 साली दादा साहेब रुपवते यांच्या हस्ते, व त्यावेळेसचे तत्कालीन नगर अध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांच्या उपस्थित मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती, व सर्व समाज बांधव यांच्या उपस्थितीत बौद्धवंदना घेऊन सन्मानाने महानगर पालिकेच्या स्वाधीन करण्यात आला.